पुस्तक पेढ़ी BOOK BANK
Student Application
पहिल्यांदा फॉर्म येथे भरावा
Please submit form first
Click Here
Student Application Status
-
New Applications NOT Accepted
- Books Distribution as per availability in stock
- From 11.11.2024 to 15.12.2024 books of 2nd, 4th and 6th semesters will be distributed to the students of class 13th to 15th from 11 am to 2 pm at Mandir Pratiksala Building 5th floor
- याअनुषंगाने दि. ११.११.२०२४ पासून ते १५.१२.२०२४ या कालावधीत मंदिर प्रतीक्षालय इमारत ५ वा मजला येथे इयत्ता १३ वी ते १५ वीच्या विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुसऱ्या, चौथ्या व सहाव्या व्या सेमिस्टरची पुस्तके देण्यात येतील
Student Enrollment Process
विद्यार्थी नावनोंदणी प्रक्रिया ( विद्यार्थी नोंदणी कालावधी जून ते ऑगस्ट )
The process is to apply online
- the subbmissition of the application this will be treated as online application
- Fee payment online - the refund will be done to the same UPI details as provided
- all the documents listed to be send to email : bookbank@siddhivinayak.org Click on more for detail steps
the application will be processed
only after receving the documents over email.
Detailed steps ......more »
संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (अटी/निकष) ( संस्था नोंदणी कालावधी जून ते सप्टेंबर )
- शैक्षणिक संस्था ही सामाजिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असल्याबाबत प्रमाणपत्राची प्रत.
- संस्थेचे उद्दीष्ट शैक्षणिक असणे आवश्यक राहिल. त्यासाठी संस्थेचे बायलाँज (उपविधी ) प्रत जोडावी.
- संस्थेकडून प्रस्थापित / नियंत्रित शाळा / महाविद्यालय हे शासनमान्य असावे. या पृष्ट्यर्थ शासनमान्यता / शासननिर्णय याची प्रत जोडणे आवश्यक राहील.
- वाचनालय असलेल्या शाळा / महाविद्यालय यांना प्राधान्य देण्यात येईल.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक शाखा निहाय व इयत्ता निहाय ( कला, वाणिज्य, विज्ञान ११ वी ते १५ वी) यादी प्राचार्यानी प्रमाणित करून प्रस्तावासोबत पाठविणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नाव केशरी शिधापत्रिकेत समाविष्ट असले पाहिजे.
- विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व गरजू असल्याबाबत प्राचार्यांनी खातरजमा करून तसे प्रमाणपत्र स्वतःच्या स्वाक्षरीने देणे बंधनकारक असेल. अन्यथा पुस्तकपेढी योजनेतून पुस्तके वितरीत केली जाणार नाहीत. तसेच विद्यार्थ्याचे नाव केशरी शिधापत्रिकेत सामाविष्ट असले पाहिजे.
- मुख्याधापक / प्राचार्यांनी प्रमाणपत्रावर केलेल्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पँनकार्डाची व ओळखपत्राची छायांकीत प्रत स्वयं स्वाक्षांकित करून पाठवावी.
- संस्थेला एकदा पुस्तके दिल्यानंतर अभ्यासक्रम बदलल्याखेरीज पुढील ३ वर्षे पुस्तके वितरीत केली जाणार नाहीत. तथापि संस्थेची विद्यार्थी संख्या वाढल्यास सदर वाढीची शासन मान्यता / शासन निर्णयाच्या अधिन राहून वाढीव विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्यात येतील. तसेच दर वर्षी वार्षिक परिक्षा संपल्यानंतर दि. १० जून पुर्वी विद्यार्थ्या कडून परत घेतलेल्या पुस्तकांचा इयत्ता निहाय व शाखा निहाय गोषवारा संबधित संस्थेने / महाविद्यालयाने न्यासास पाठविणे बंधनकारक आहे.
- प्राचार्य /मुख्याध्यापकांनी शाखा निहाय व इयत्ता निहाय आवश्यक असलेल्या पुस्तकांची लेखकांच्या नावासहित यादी सादर करून पुस्तकांची मागणी करावी. सदर यादी तपासून पुस्तकांचे वितरण न्यासाकडून केले जाईल.
- ज्या महाविद्यालयांना न्यासाकडून पुस्तके पुरविण्यात आली आहेत त्यांच्या पुस्तकांचे व अभिलेखांची न्यासाकडून संस्थेला भेट देऊन तपासणी करण्यात येऊ शकेल.
संस्थांसाठींचे निकष ......अधिक »